भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली

vaikunthahuni ali | dhanya tulashi mauli

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैकुंठाहुनी आली । धन्य तुळशी माउली ॥१॥ वंदिती जया हरिहरा । सर्व करिती नमस्कारा ॥२॥ देव इंद्रादिक सर्व । तुळशी पूजनें गौरव ॥३॥ ऎशी तुळशी माउली । एका जनार्दनीं वंदिली ॥४॥