भजनी मालिका

भजने

वेदांचा विवेक शास्त्रांचा हा बोध । तो ह परमानंद विठ्ठलमूर्ती ॥१॥ पुराणासी वाड साधनांचे कोड । ते गोडांचे गोड विठ्ठलमूर्ती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाचा वेदार्थ शास्त्राचा शास्त्रार्थ । आमुचा परमार्थ वेगळाची ॥१॥ श्रुतीचें निजवाक्य पुराणींचे गुज । आमुचें आहे निज वेगळेंची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद । नामाचा मकरंद पुराण वदे ॥१॥ शास्त्रांचें मत नामाचा इतिहास । यापरती भाष नाहीं नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाचिया बोला कर्मातें गोंविला । परी नाहीं भजला संतालागीं ॥१॥ घोकूनियां वेद द्वैत नवजाय । वाउगाची होय श्रम तया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाचिया मतें विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी ॥१॥ वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनीं नेटका भाव सोपा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥ विठोबाचें नाम सुलभ सोपेरें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वेदाचें महिमान जनीं जनार्दन । आणिक वचन तेथें नाहीं ॥१॥ भूतीं दया धरा भक्तिभाव करा । हरिहरां वेद सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केलें ॥१॥ कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदांचे सार निगमाचे माहेर तो हा परात्पर उभा विटे ॥१॥ शास्त्रांचे निजगह्र पुराणाचे निजसार । तो हा विश्वभर उभा विटे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाचें हें सार वैराग्याचें जीवन । चिदाकाशींची खूण परम गुज ॥१॥ जें शुद्धज्ञान गुह्य मोक्षमुक्ति बीज । सकळ मंत्रराज मंगलानिधी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदांत सिद्धांत पाहतां खटपट । वाउगा बोभाट नामविण ॥१॥ नामें होय भुक्ति नामें होय मुक्ति । नामें वैकुंठप्राप्ति सर्व जीवां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदादिक श्रमले न कळे जया पार । शस्त्रांसी निर्धार न कळेची ॥१॥ तो हा श्रीहरी नंदाचिया घरीं । क्रीडे नानापरी गोपिकांसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदाध्ययन करिसी तरी वैदिकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥१॥ पुराण सांगसी तरी पुराणीकचि होसी । परी वैष्णव न होसी अरे जना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेदान उद्धरते । मीनरुपेण जगन्निवहते । कच्छरुपेण भूगोल ते । पृथ्वी चक्रमुद्विभ्रामंते ॥१॥ ऊर्ध्व धारयंते । हिरण्याक्ष दैत्य शोधियंते । दंतावरी पृथ्वी धारयंते । वराहरुपेण दैत्य मारियंते ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥१॥ मुख्य चारी वर्ण यांचा पैं धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ