भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगीं त्याचा

vaikhari vacha vade ramakrushna | dhanya vansh sampurna jagin tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैखरी वाचा वदे रामकृष्ण । धन्य वंश संपूर्ण जगीं त्याचा ॥१॥ आठवी नित्य नाम सदा वाचे । कळिकाळ त्यांचें चरण चुरी ॥२॥ शिव विष्णु ब्रह्मा इंद्रादिक देव । करिती गौरव त्याचा बहु ॥३॥ जनार्दनाचा एका सांगतसे उपाव । धरा नामीं भाव दृढ जनीं ॥४॥