भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती

vaikuntha javaya na lage te sayas | ramanamen pash drudh tutati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वैकुंठा जावया न लगे ते सायास । रामनामें पाश दृढ तुटती ॥१॥ तारिलें वानर वनचरे रामें । गोपिका त्या कामें मुक्त केल्या ॥२॥ गोपाळ सवंगडे नामेंचि तारिलें । जडजीव उद्धरिले कलियुगीं ॥३॥ एका जनार्दनीं सांगांवें तें किती । रामनामें मती न लगे याची ॥४॥