भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठवासिनी कृपावंत माउली। जगा तारावया अळंकापुरा आली

vaikunthavasini krupavant mauli| jaga taravaya alankapura ali

रचनाकार: संत सेना · अभंग
वैकुंठवासिनी कृपावंत माउली। जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥ शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई। ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥२॥ येउनी प्रतिष्ठानी पशुवेद बोलविला । पंडित ब्रह्मज्ञानी यांचा गर्व हरिला ॥३॥ तप्तीतीरवासी चौदाशे वर्षांचा होता । तयाचा अभिमान गर्व हरी आदिमाता ॥४॥ वाळितां ब्राह्मणीं स्वर्गाचे पितर आणविले। सेना म्हणे जगीं पूर्णब्रह्म अवतरलें ॥५॥