भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ

vaikunthasi amhan nako dhadun hari | vas de pandharin sarvakal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वैकुंठासी आम्हां नको धाडूं हरी । वास दे पंढरीं सर्वकाळ ॥१॥ वैकुंठ कोपत जुनाट झोंपटी । नको अडा अडी घालूं आह्मां ॥२॥ वैकुंठीं जाऊनि काय बा करावें । उगेंचि बैसावें मौनरूप ॥३॥ नामा ह्मणे मज येथेंच हो ठेवीं । सदा वास देंई चरणांजवळी ॥४॥