भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक

vaikunthincha dev anila bhutala | dhanya to agala pundalik

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥ धारीष्ट धैर्याचा वरीष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥ पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगें ॥२॥ अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥ धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥