भजनी मालिका
← भजनांकडे परत

वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरीं

vaikunthicha hari tanha yashodechya gharin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥ संगतसे हा अंगणी माथा जावळाची वेणी॥२॥ पाय पैंजण आणि वाळे हातीं नवनीताचे गोळे ॥३॥ धन्य यशोदा ते माय दासी जनी बंदी पाय ॥४॥