भजनी मालिका

भजने

विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विषयाचें सुख मानितो पामर । भोगितो अघोर नरकगती ॥१॥ मारिती ताडिती यमाचे किंकर । कोण सोडी साचार त्यासी तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठें नाहीं ॥१॥ शुद्ध करूनि मन घ्यावें रामनाम । संतांचें पूजन क्रिया हेची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विषयीं आसक्त जालें माझें मन । न करी तुझें ध्यान पंढरीराया ॥१॥ नाथिले संकल्प करी नानाविध । तेणें थोर खेद पावतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषयीं विरक्तपण इंद्रियेनिग्रहण गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे चंचळपणें मन न करी विषयध्यान । गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे बुध्दि बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण ।

रचनाकार: संत रामदास

विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विषाची पाजिती पुरीं ढकलिती । परि निर्भय तो चित्ती घेत नाम ॥१॥ संतप्त होउनी पुसताती बाळा । काय वेळोवेळां आठविसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळसी सखें वोंगळाची ॥१॥ नये पाहों कांहीं गो†हवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विष्णु विष्णु हरि पावे लवकरी । ब्रिद चराचरीं सांगे मुनी ॥१॥ वैकुंठवासिनी कृष्णविष्णुदेव । नामातें गौरव आ-म्हांलागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विष्णुदासा घरें ब्रह्माज्ञान लोळे । म्हणतसे बळें घ्या घ्या कोणी ॥१॥ आरुषे सावडे नाम मुखीं जया । ब्रह्माज्ञान तया विनवितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विष्णुनामपाठ करी वेळोवेळां । पाहे तूं सावळा विष्णुसखा ॥१॥ विष्णुनाम गाय अंतरी सर्वदा । तुटें जन्मजरा बाधा येणें नामें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥ साधनें संकट सर्वांलागीं शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम