भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठें नाहीं

vishayachya vyathen duhkh bhogito aghor | taya duja thar kothen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयाच्या व्यथें दुःख भोगितो अघोर । तया दुजा थार कोठें नाहीं ॥१॥ शुद्ध करूनि मन घ्यावें रामनाम । संतांचें पूजन क्रिया हेची ॥२॥ उपदेश किती सांगावा वेळोवेळां । अमंगळ अंधळा नेणे कांहीं ॥३॥ एका जनार्दनीं विषयाच्या संगें । कर्मकांड लागे भोगणे तेथें ॥४॥