भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णुमुद्रेचा अंकिला । तोचि वैष्णव एक भल

vishnumudrecha ankila | tochi vaishnav ek bhal

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विष्णुमुद्रेचा अंकिला । तोचि वैष्णव एक भल ॥१॥ अहं जाळोनी अंगारा । सोहंभस्मी तीर्थ सारा ॥२॥ विष्णु माया द्वारावती । भक्तिमुद्रा त्या मिरवती ॥३॥ पंचायतन पुजी भावें । अहं सोहं भस्मीं नांवें ॥४॥ प्रेमतुळसी कानीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥