भजनी मालिका

भजने

विश्वासिया नाहीं लागत सायास । अनायासें रसा अंगा येतो ॥१॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विष पाजावया पूतना ते आली । ते तुवां तारिली काय म्हणुनि ॥१॥ पुसा या म्हणोनि वेश्या बोभाईलि । ती तुवां तारिली काय म्हणूनि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥ मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं ॥१॥ नको नको देवा वासनेचा संग । मज आला दुभंग नारायणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषय विरह गुंतले संसारीं । तया जन्म जन्मातरीं फेरी । कोणी न सोडवी निर्धारीं । यालागी न गुंता संसारीं ॥१॥ मज सोडवा तुम्हीं संतजन । या विषयविरहापासोन ॥धृ ॥

रचनाकार: संत एकनाथ

विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥ काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

विषयवासना भाजी त्याचें मूळ । मग सुख कल्लोल प्राप्ति तुज ॥१॥ आशेचें काबाड कल्पना सगळी । अपटोनि मुळी टाकी परती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विषया जो लंपट । तया नावडे ही वाट । पंढरी सुभट । नावडेचि पापिष्ठा ॥१॥ अमृत फळें पूर्ण आलीं । कां गा जैसी परी जालीं । तैसीच हे चाली । पापिष्ठाची जाणावी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विषयाचा आंदण दिसे केविलवाणा । करीतसे कल्पना नानाविध ॥१॥ कुटुंब पाईकं ह्मणवी हरिचा दास । मागे ग्रासोग्रास दारोदारीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विषयाचे अभिलाषे सबळ भेदु भासे । विषयलेषु तेथें मुक्ति केवीं वसे ॥१॥ विषयतृष्णा सांडी मग तूं साधन मांडी । वैराग्याची गोडी गुरुसी पुसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥ सर्व हें लटिकें जाणूनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव