भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस

vishayin houni udas | sandin sansarachi as

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयीं होऊनि उदास । सांडीं संसाराची आस ॥१॥ ऐसी मुक्ताची वासना । मुमुक्षु चिंती तुझ्या चरणा ॥२॥ ब्रह्माज्ञान लाळ घोटी । येरी वाउगी ती आटी ॥३॥ शब्द निःशब्द खुंटला । एका जनार्दनीं देखिला ॥४॥