भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णुनामपाठ करी वेळोवेळां । पाहे तूं सावळा विष्णुसखा

vishnunamapath kari velovelan | pahe tun savala vishnusakha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विष्णुनामपाठ करी वेळोवेळां । पाहे तूं सावळा विष्णुसखा ॥१॥ विष्णुनाम गाय अंतरी सर्वदा । तुटें जन्मजरा बाधा येणें नामें ॥२॥ जानर्दनाचा एका विष्णुरुप देखा । जनार्दन सखा एकरुप ॥३॥