भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयाचें सुख मानितो पामर । भोगितो अघोर नरकगती

vishayachen sukh manito pamar | bhogito aghor narakagati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयाचें सुख मानितो पामर । भोगितो अघोर नरकगती ॥१॥ मारिती ताडिती यमाचे किंकर । कोण सोडी साचार त्यासी तेथें ॥२॥ कळोनी पडती न कळोनी पडती । कोण होईल गती न कळे तया ॥३॥ एका जनार्दनीं येतसे करुणा । म्हणोनि वचना बोलणें हें ॥४॥