भजनी मालिका

भजने

वृक्ष पाहतां परतला आगम । निगमा न कळे दुर्गम । वेदशास्त्रांसी निरुतें वर्म । तो वृक्ष देखिला विठ्ठलनाम ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वृक्ष व्याला आकाश पाताळ । वृक्षीं प्रसवलें लोकपाळ । आठ्ठ्यायेंशीं सहस्त्र ऋषिमंडळें ॥१॥ कान्होबा बोलों तुझें कोडें । अर्थ ऐकतां ब्रह्मा जोडें । अभक्त होती केवळ वेडे रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वृत्तीवरी आम्हां येणें काशासाठी । एवढी हे आटी सोसावया ॥१॥ जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

वृदांवनीं वेणू कवणाच माये वाजे । वेणुनादें गोवर्धनू गाजे । पुच्छु पसरुनि मयोर विराजे । मज पाहतां भासती यादवराजे ॥१॥

रचनाकार: संत भानुदास

वृध्द ते म्हणती संसार करावा । जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें ।। म्हणताती जन बरें ते कोणाला । बुडविती त्याला ऐशा बोधी ।।

रचनाकार: संत रामदास

वृषभाच्या रूपें आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी ॥१॥ बहू देतो त्रास गोकुळींच्या जना । धांवधांव कृष्णा मारी याला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेडा नव्हे मुका चतुर शहाणा । बोले अबोलणा मौनावस्था ॥१॥ विष्णुदासा निळा वाचा विदेहता । अंगी सप्रेमता आवडीची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥ गोवर्धन धरूं शिरी उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

वेडावली वाचा वेदाची बोलतां । देवा पाहूं जातां अनिर्वाच्य ॥१॥ अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली । जिव्हा हे चि-रली भूधराची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तीभावेंविण भक्ती तैसी ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम