भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णुदासा घरें ब्रह्माज्ञान लोळे । म्हणतसे बळें घ्या घ्या कोणी

vishnudasa gharen brahmadnyan lole | mhanatase balen ghya ghya koni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विष्णुदासा घरें ब्रह्माज्ञान लोळे । म्हणतसे बळें घ्या घ्या कोणी ॥१॥ आरुषे सावडे नाम मुखीं जया । ब्रह्माज्ञान तया विनवितसे ॥२॥ माझा अंगिकार करा संतजन । ऐसें ब्रह्माज्ञन कींव भाकी ॥३॥ एक जनार्दनीं संताचें चरणीं । होउनी दीन वदनीं कींव भाकी ॥४॥