भजनी मालिका

भजने

विवेक वैराग्य दोघें भांडती । ज्ञान अज्ञान पाहाती रे । आपुले स्वरुपीं होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टी रे ॥१॥ हुतुतुतुतु खेळूं रे गडिया हुतुतुतुतु खेळू रें । रामकृष्ण गोविंद हरी नारायण निशिदिनीं भजन करा रे ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

विश्रांतीचें आसन घालुनियां जपा । मंत्र तोचि सोपा रामनाम ॥१॥ सर्व याती वर्णा आहे अधिकार । रामनाम उच्चार सोपा बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विश्रांतीचें स्थान संतांचें माहेर । तें या भूमीवर अलंकापूर ॥१॥ तये स्थळीं माझा जीवाचा वो ठेवा । नमीन ज्ञानदेवा जाऊनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विश्व अवघें मायाभास । माया ब्रहमीं नाहींची मोस ॥१॥ जेविं वन्हि सूर्यकांतीं । प्रगटतां कीर्ण त्या नेणति ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विश्व भुलवी योगमाया तो । गोकुळीं रहिवासु तो गे बाई ॥१॥ वसुदेवकुमरु तो । देवकीनंदनु तो गे बाई ॥ध्रु०॥

विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥ दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ।।१।। दर्शना आलिया हृदयीं संचरसी। देहभाव घेसी हिरोनियां ।।२।।

रचनाकार: संत गोणाई

विश्वंभर नाम तुझें कमळापती । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥ गौळियां घरींचें दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसी ना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव