भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयीं होउनी उदास । सांडी संसाराची आस

vishayin houni udas | sandi sansarachi as

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयीं होउनी उदास । सांडी संसाराची आस ॥१॥ तरीच पावाल चरण । संतसेवा घडेल जाण ॥२॥ होऊन उदासवृत्ति । भजन करा दिनरातीं ॥३॥ ऐसी आवड धरा मनीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥