भजनी मालिका

भजने

विश्वाचा जो बाप हातीं ज्याच्या सूत्र । ह्मणवितो पुत्र नंदजीचा ॥१॥ तीर्थें ज्याच्या चरणीं करीतातीं न्हाणीं । य-शोदा जननी म्हणताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वाचा व्यापक विश्वंभर साक्षी । नये अनुमानासी वेदशास्त्रां ॥१॥ नवल गे माय नवल गे माय । चोरुनियां खाय नवनीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विश्वाच्या मोहना कपट नाटका । पंढरीनायका पांडु-रंगा ॥१॥ अवतार धरूनि होऊनि निमित्त । बुजविसी दैत्य सर्प खाणी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नीं प्रगटे आपण ।।१।। देखोनियां द्विजवरातें नमियेलें जोडुनी हातें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

विश्वामित्रें जाऊनि पुढें। वणवा लाविला चहूंकडे ।।१।। धूम्र दाटलें अंबर। ज्वाळा येती भयंकर ।।२।।

रचनाकार: संत जनाबाई

विश्वास अंतरींचा जाणोनी । नाम ठेवा माझया वदनीं । रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ करीन तैसी घ्यावी सेवा । विश्वास पालटों न दयावा ॥ आईका विनविलें तें देवा । अहो पंढरीनिवासा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥ तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम