भजनी मालिका

भजने

वेडिया उपचार गाढवा गुर्‍हाळ । ह्मैसिया बिर्‍हाड पुष्पवनीं ॥१॥ पद्मासनीं केंवि कुंजर हा बैसे । कोडिया न दिसे चंदन बरवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥

रचनाकार: संत तुकाराम

वेणु वाजवीत यमुनेच्या तटीं । उभा कान्हया सांवळा जगजेठी । भोंवती गोधनें वो थाटीं । एकोनि गवळणी धांवती उठाउठीं वो ॥१॥ ऐसा जनमन मोहनरंजवणा । गुणीं गुणातीत नंदाचा पोसणा । करुनि अकर्ता हा सृष्टयादिरचना । विश्वीं विश्वातीत अलक्ष देखणा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वेणुनादीं चरे पाणी पी भीवरे । ते धेनु हूंबरे वत्सांलागीं ॥१॥ वाणें ते सांवळी नामें ते श्रीधरा । चरे वसुंधरा चवदा भुवनें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेणू वाहूनि चित्त दुहिलें । रूप देऊनि मज मनें मोहि यलें ॥१॥ वेधु वेधकू गोपाळ लाघवी । जीवा लवियली आवडी नित्य नवी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वेद घेऊनियां गेला शंखासुर । मत्स्य अवतार जयालागीं ॥१॥ तोचि महाराज भिवरेचे तटीं । उभा जगजेठी विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेद तो आम्हां जनार्दन । शास्त्र तें आम्हां जनार्दन । पुराण जनार्दन । सर्वभावें ॥१॥ सुख जनार्दन । दुःख जनार्दन । कर्म धर्म जनार्दन । सर्वभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

वेद प्रमाण करावया गोकुळासि आला । कीं नाटळिचा कुवांसा जाला । ब्रह्म आणि गोवळा । ब्रह्मादिका वंद्यु ऐसा निगमु । पैं लाजविला ॥