भजनी मालिका

भजने

विष्णुमूर्ति चतुर्भुज शंख चक्र हातीं । गदा पद्म वनमाळा शोभती ॥१॥ गाई गोपाळ सवंगडे वनां । घेऊनीयां जाय खेळे नंदाचा कान्हा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

विष्णूचें सेवन जये गांवीं पूजा । नित्य तया द्विजा समारंभु ॥१॥ घरीं वृंदावन नित्य अन्नदान । श्रीकृष्ण आपण तेथें असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विष्णूसी भजला शिव दूराविला । अध:पात झाला तया नरा ॥१॥ शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी । तया-चिये घरीं यम नांदे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त झाले ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

विसावा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमपान्हा घाली भक्तांवरी ॥१॥ दाखवी चरण दाखवी चरण । दाखवी चरण नारायणा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

विसावा विश्वाचा जो प्राण जीवाचा । तोचि नित्य वाचा जपों आम्ही ॥१॥ गोविंद वामन भावयुक्त भजन । सर्व जनार्दन हाचि भाव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

वीतभर पोट लागलेंसे पाठी । साधुसंगें गोष्टी सांगूं न देई ॥१॥ पोट माझी माता पोट माझा पिता । पोटानें ही चिंता लाविलीसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव