भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयालागीं उपाय जाण । नानापरी करिसी शीण

vishayalagin upay jan | nanapari karisi shin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
विषयालागीं उपाय जाण । नानापरी करिसी शीण ॥१॥ पोट भरावया भांड । वाजविताती जैसें तोंड ॥२॥ विशयवासना ती थोर । वरी दाविती आदर ॥३॥ एका जनार्दनीं शरण । तंव न चुके देहींचें पतन ॥४॥