भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

कन्या गौ करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥१॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥१॥ जग डरे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदसाहि पैठा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥ शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥१॥ कोणाकारणें हें झालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥१॥ सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥ निरसनें माझा होईल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करावा उद्धार हें तुम्हां उचित । आम्ही केली नीत कळली ते ॥१॥ पाववील हाक धांवा म्हणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥ जाणतसां तुह्मीं लाघव रूपाचें । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करावा संकोच चित्तासी भोवता । होय ते बहुता सुख कीजे ॥१॥ देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥धृ॥

रचनाकार: संत तुकाराम