भजनी मालिका
← भजनांकडे परत

कथेची सामग्री । देह अवसानावरी

kathechi samagri | deh avasanavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कथेची सामग्री । देह अवसानावरी ॥१॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥२॥ तुका म्हणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥३॥