भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणति साधु ॥१॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाठी घेती प्रतिग्रह ॥१॥ परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥१॥ म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें भाग्य कई लाहाता होईन । अवघें देखें जन ब्रम्हरूप ॥१॥ मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥ वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होईल भाव ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृत्तिका ॥१॥ उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसिद्धी ॥१॥ नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कईवाड तोंच वरि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥१॥ न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें ॥१॥ आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । कळवेळ तुटी झाल्या तरे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कई ऐसी दशा येईल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥१॥ नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कई देखतां होईन डोळीं । सकळां भूतीं मूर्ती सांवळी । जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥१॥ ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होईन । प्रेमसागरीं बुडईन । होईल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

कई मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥१॥ केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होईल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम