भजनी मालिका
← भजनांकडे परत

करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा

karava uddhar kinva ghyavi hari | eka bola sthiri rahen deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला स्थिरी राहें देवा ॥१॥ निरसनें माझा होईल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥ राहिलों डीकोनी कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥२॥ तुका म्हणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥३॥