भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करील तें काय नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥१॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करूं याची कथा नामाचा गजर । आम्हां संवसार काय करी ॥१॥ म्हणवूं हरीचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें कळिकाळ ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥१॥ जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करूनी आइती सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न येचि देव येतील कामलहरी रे । पडिली दुश्चिती तंव तो कवाड टिमकारी वो रे ॥१॥ सर गा परता तुझा कळला भाव । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥१॥ येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम