भजनी मालिका
← भजनांकडे परत

कन्या सासुर्‍यासि जाये । मागें परतोनी पाहे

kanya sasur‍yasi jaye | magen paratoni pahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कन्या सासुर्‍यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥१॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥ चुकलिया माये । बाळ हुरू हुरू पाहे ॥२॥ जीवना वेगळी मासोळी । तैसा तुका म्हणे तळमळी ॥३॥