भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साच अंगीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रम्हांदिकां पार नुलंघवे सामर्थे ॥१॥ शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना । आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥ मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साठी जीवें भावें नारायणा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितां होय होय चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥१॥ मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एक एकां॥१॥ गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करितों कवित्व म्हणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥१॥ माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥१॥ देसी कीं न देसी पायांचें दर्शन । म्हणऊनि मन स्थिर नाहीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न म्हणें संत ॥१॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राम्हण । तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥ तैसें झालें दोघांजणां । मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम