भजनी मालिका
← भजनांकडे परत

कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया

karal ten kay navhe ji viththala | chitta dyaven bola bobadiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥१॥ सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥ ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा ते उरे मागुताले ॥२॥ तुका म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥