गोपाळ विनोदें बोलती । तिरस्कारिती गोविंदा
gopal vinoden bolati | tiraskariti govinda
गोपाळ विनोदें बोलती । तिरस्कारिती गोविंदा ॥१॥ लाज ना भये नाहीं काम यासी । मोकळा सकळांसी ठाउका असें ॥२॥
gopal vinoden bolati | tiraskariti govinda
गोपाळ विनोदें बोलती । तिरस्कारिती गोविंदा ॥१॥ लाज ना भये नाहीं काम यासी । मोकळा सकळांसी ठाउका असें ॥२॥
gopalapuranivasiya | aga thakaliya vitevarin
गोपाळपुरनिवासिया । अगा ठाकलिया विटेवरीं ॥१॥ पदयनाभा शेषशयना । अगा ये सूदना दैत्यकुळा ॥२॥
gopivallabha kamalakanta | anathanatha shrivithathala
गोपीवल्लभा कमलाकान्ता । अनाथनाथा श्रीविठठला ॥१॥ तुमचा दास झालों आतां । करा जी सरता पायापें ॥२॥
gomata mhanati manavadeho | kela upav phal deto
गोमटा म्हणती मानवदेहो । केला उपाव फळ देतो ॥१॥ तरी कां माझा विफळ गेला । धांवा केला तुमचा तो ॥२॥
gomate pay dekhile dithin | saman nehati vitechiye
गोमटे पाय देखिले दिठीं । समान नेहटी वीटेचिये ॥१॥ तैंचिपासुनी लागला छंद । याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥
goval deti ushtavali | mhanati god hen vanamali | ghaluniyan shrimukh tya kamalin | param santoshen svikari
गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥१॥ आवडीचें तेचि तें गोड । भाव देखे ज्याचा वाड । त्याचेचि घे येरा निचाड । दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥
govalasange choriya kari | shinki utaruniyan baheri | ani phodi govalakarin | kaval det loniyache
गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥१॥ दूध तूप साय लोणी । दहीं हुडकूनियां आणी । खाय लवंडी आणि पोरा लागुनी । देऊनियां धणी सुखी करी ॥२॥
govali hote rakhanaint | te te mhanati jhala ghat | gai bujalya akasmat | padanapat tya jhala
गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला ॥१॥ मग ते आले पायवाटा । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचिया सुकाळा । केले वत्सां आणि गोळियां ॥३॥
govilen indriyan | pay dithi davuniyan
गोविलें इंद्रियां । पाय दिठी दावूनियां ॥१॥ ऐसा लाघवी नाटकी । चोर चैतन्य चेटकी ॥२॥
ghandu jatan alakanr | hoti avaghechi shrungar
घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार ॥१॥ नलगे उजळाही देणें । शोभती अंगीच्या बरवेंपणें ॥२॥
ghado tyacha samagam | jyachen prem vithathalin
घडो त्याचा समागम । ज्याचें प्रेम विठठलीं ॥१॥ सहज त्याच्या ऐकतां गोठी । परमार्थ पोटीं दृढावे ॥२॥
ghan:shyam murti rajivalochan | santhavalen tribhuvan udaramaji
घन:श्याम मूर्ति राजीवलोचन । सांठवलें त्रिभुवन उदरामाजी ॥१॥ कौस्तुभ पदकें तुळसीमाळा कंठी । कास हे गोमटी पीतांबरें ॥२॥
gharin apuliya matepashin | dekhoniyan magen shashi | mhane deniva khelavayasi | anuni to maj hatin
घरीं आपुलिया मातेपाशीं । देखोनियां मागें शशी । म्हणे देंईवा खेळावयासी । आणूनी तो मज हातीं ॥१॥ येरी म्हणे परिसे ताता । गगनींचा तो नये हाता । नको छळूं रे कृष्णनाथा । नाहीं तेंचि मागों नको ॥२॥
gharoghari hechi katha | yereyeran sangati varta mhanati rayasi padili thonr chinta | putanabai nimaliya
घरोघरी हेचि कथा । येरेयेरां सांगती वार्ता म्हणती रायासी पडिली थोंर चिंता । पूतनाबाई निमालिया ॥१॥ नवलचि तें ऐकता परी कैसी शोशिली निमिशावरी । सांगती दासी त्या परिचारी । ऐका अपूर्व हे कथा ॥२॥
ghant garje mahavdarin | viththal namen vageshvarin
घांट गर्जे महाव्दारीं । विठ्ठल नामें वागेश्वरीं ॥१॥ निळा उभा तो देखिला । भाव भक्ति आलिंगिला ॥२॥
ghalitan umanin pora numajati tuj | ukaluniyan hari ghei hadaichen nij
घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज । उकलूनियां हरि घेई हदईचें निज ॥१॥ असोनियां चराचरीं न दिसे तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥
ghumaghumiti moharya naden
घुमघुमिती मोहर्या नादें । पांवे छंदें वाजविती ॥१॥
gheuniyan krutrim songe | nanaparinchya natati rangen
घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥ आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥
ghokauni veda | jenen aniyele bodh
घोकउनी वेदा । जेणें आणियेले बोध ॥१॥ तो हा पंढरपुरनिवासी । नित्य उभा भक्तांपासी ॥२॥
chadhoniyan jhada pora khelasi surakandi | nisaratan hat pay majha hoil modi
चढोनियां झाडा पोरा खेळसी सुरकांडी । निसरतां हात पाय माझा होईल मोडी ॥१॥ धरुनी हरि चित्तिसी खेळे वरिझाडा । अभिमानें जासी तरी होईल चुरा हाडा ॥२॥