भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज । उकलूनियां हरि घेई हदईचें निज

ghalitan umanin pora numajati tuj | ukaluniyan hari ghei hadaichen nij

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घालितां उमाणीं पोरा नुमजति तुज । उकलूनियां हरि घेई हदईचें निज ॥१॥ असोनियां चराचरीं न दिसे तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥२॥ एक ना दिसें तें काय । नाहीं जया कान डोळे मुख हात पाय ॥३॥ एक ना अनेक नव्हे नव्हेचि कांहिबाहीं । नसोनियां तेंचि वसे अखंड देहादेहीं ॥४॥ निळा म्हणे सांग माझें ऐकें हें उमाणें । नेणवेत रिपुस सुखे हरिचीं हीं लक्षणें ॥५॥