गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें
garjatan vithobachya namen | jalilin karme shubhashubhen
गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें ॥१॥ रिघाले अवघियां बाहेरी । विठ्ठल अंतरीं धरुनियां ॥२॥
garjatan vithobachya namen | jalilin karme shubhashubhen
गर्जतां विठोबाच्या नामें । जाळिलीं कर्मे शुभाशुभें ॥१॥ रिघाले अवघियां बाहेरी । विठ्ठल अंतरीं धरुनियां ॥२॥
garjaviti bhragavadunin | sarvada vani nitighoshen
गर्जविती भ्रगवदुणीं । सर्वदा वाणी नीतीघोषें ॥१॥ तेणेंचि पावन करिती जगा । भवभय भंगा पावउनी ॥२॥
gailechi gatan gitin | pavade tumachenchi shripati | sahasa dhani na pure chittin | saritan ratidivas yugen
गाइलेचि गातां गीतीं । पवाडे तुमचेंचि श्रीपती । सहसा धणी न पुरे चित्तीं । सरितां रातिदिवस युगें ॥१॥ अनंता युगी अनंत खेळ । अनंता नामा रुपांचे मेळ । अनंत संपादिलें जे निर्मळ । पढतां वाचे उल्हासु ॥२॥
gain kirtanin gun nam pavade | tumache tumhan pudhe avadinen
गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे । तुमचे तुम्हां पुढे आवडीनें ॥१॥ भावा ऐसे माझया व्हा जी पांडुरंगा । मग मी आलें भागा करीन तें ॥२॥
gauniyan alhar mukhen | nirji nijavi tya sukhen
गाऊनियां आल्हर मुखें । निर्जी निजवी त्या सुखें ॥१॥ आवडी ते नीच नवीं । वस्त्रें अळंकार लेववी ॥२॥
gay vatsan dekhatan drushti | mohen uthi panha ye
गाय वत्सां देखतां दृष्टी । मोहें उठी पान्हा ये ॥१॥ चाटी तया देउनी धणी । भरी दुधाणी इतरांची ॥२॥
gun lavanya sampatti | pandurang balamurti | sarva sukhachi vishranti | charani lolati maha sidhdi
गुण लावण्य संपत्ती । पांडुरंग बाळमूर्ती । सर्व सुखाची विश्रांती । चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥ विटे पाउलें समान । कांसे क्षीराब्धी परिधान । हात कटावरी ठेवून । तुळशीसुमन वनमाळा ॥२॥
gun lavanyachi khani | vithoji mugutamani sakalancha
गुण लावण्याची खाणी । विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥ जाणे अंतरींचा भाव । देवादिदेव पूजनीय ॥२॥
gun varnitan bhagala shesh | mahima vishesh nakale to
गुण वर्णितां भागला शेष । महिमा विशेष नाकळे तो ॥१॥ वेदहि ठकोनि ठेले मौन । पार नेणोन स्वरुपाचा ॥२॥
guntali te asha | padili mohajal phansa
गुंतली ते आशा । पडिली मोहजाळ फांसा ॥१॥ न देखोनियां श्रीहरी । कर्ता भोक्ता संसारीं ॥२॥
gela phironiya divas | na ye ghatika lav nimish
गेला फिरोनिया दिवस । न ये घटिका लव निमिष ॥१॥ आहे तोंचि भरा हातीं । महा लाभाची संपत्ती ॥२॥
gelen venchoniyan vay yachipari | chinta mahapurin vahavalon
गेलें वेंचोनियां वय याचिपरी । चिंता महापुरीं वाहवलों ॥१॥ धरियेला होता तो विश्वास मानसीं । येणें काळें त्यासीं क्षय आला ॥२॥
geleti apulya bridaten visaroni | aisen dharilen mani nishthurapan
गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी । ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण ॥१॥ येरवी ऐकोनि धांवतसां धांवा । तें आजि केशवा काय झालें ॥२॥
god tujhi bridavali | god gatan nityakalin | god bhakta bhaven bali | tun vanamali tyapashin
गोड तुझी ब्रीदावळी । गोड गातां नित्यकाळीं । गोड भक्त भावें बळी । तूं वनमाळी त्यापाशीं ॥१॥ गोड तुमचीं नामें गाती । गोड कीर्तनीं उभे ठाकती । गोडा गोड तूं श्रीपती । त्याची भुक्ति मुक्ति तूंचि तूं ॥२॥
god nam tumachen deva | god seva tumachi te
गोड नाम तुमचें देवा । गोड सेवा तुमची ते ॥१॥ गोड तुमची कीर्ति वाणी । गोड श्रवणीं ऐकतां ॥२॥
god majhi vani tumhin karuni shrihari | lavavi vaikhari kirtanastavanin apuliye
गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी । लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥१॥ इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचें । अभयदान तुमचें ऐसें झालियावरी ॥२॥
god lagen jen apanan | tenchi vantin sakalanjanan
गोड लागें जें आपणां । तेंचि वांटीं सकळांजणां ॥१॥ पोट भरेतों पुरवी । उरलें बांधोनियां ठेवी ॥२॥
goda god tumachen nam | god janma smaranen tya
गोडा गोड तुमचें नाम । गोड जन्म स्मरणें त्या ॥१॥ गोड वाचा पढतां गीत । गोड चित्त चिंतवें गोड ध्यानें तुमच्या मन । गोड स्तवने गुण वाणी ॥२॥
godhanen gheuni gopal ale | chhayesi baisale kalambachiye
गोधनें घेउनी गोपाळ आले । छायेसी बैसले कळंबाचिये ॥१॥ आतां म्हणे मांडा खेळ । गोमटी हे वेळ सांपडली ॥२॥
gopal mhanati kanhaya amuchin umanin | sangasi tari charanin thenvun matha
गोपाळ म्हणती कान्हया आमुचीं उमाणीं । सांगसी तरि चरणीं ठेंवूं माथा ॥१॥ यावरीं श्रीहरि बोले मधुराक्षरीं । पुसा रे झडकरी विलंब नका ॥२॥