भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

जाणीवचि माझी गिळूनि ठेला । नेणीवेतें प्याला निपटूनियां ॥१॥ निढळवाणें मज करुनि ठेविलें । जीवाचेंही हरिलें जीवपण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें । तुमच्या निजध्यासें मनचि मुरे । तुमचिये भेटीं अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां ॥१॥ ध्यानें तुमच्या जीवचि हारपे । तुम्हांसी जाणतां बुध्दीचि करपे । तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें । मिसळें चिद्रुपें चैतन्येंसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जांताचि गोकुळा बाहेरी । कृष्णपाउलांचिया हारी । उमटल्या देखोनि महीवरी । प्रेमा अंतरीं न संटे ॥१॥ चरणमुद्रांकित चिन्हें । देखोनि घाली लोटांगणें । अंतर्निष्ठेंचें हें लेणें । लेउनी निमग्न ते ठायी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जारण मारण स्तंभन मोहन । वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥ येणेंचि मिरविती जगीं । अशुचि अनुरागीं निरंतर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें ॥१॥ तैसें केलें माझें वाचें । तुम्हीं सामार्थ्याचें बोलणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिणे मरणें नाहीं आतां । हरीच्या भक्तां कल्पांती ॥१॥ त्याच्या ध्यानें तैसेंचि आलें । आपुला विसरले देहभाव ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव । पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें ॥१॥ आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन । मी माझें हें जतन कोण करी यावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिहीं अवलोकिला डोळां । हरील्या त्यांच्या जीवनकळा ॥१॥ ऐसा अनादि हा बुडवणा । आहे ठावा विचक्षणा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा