भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोमटा म्हणती मानवदेहो । केला उपाव फळ देतो

gomata mhanati manavadeho | kela upav phal deto

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोमटा म्हणती मानवदेहो । केला उपाव फळ देतो ॥१॥ तरी कां माझा विफळ गेला । धांवा केला तुमचा तो ॥२॥ कांहीच न करा आश्वासन । उध्दिग्न मन यासाठीं ॥३॥ निळा म्हणे यावरी काय । किजे उपाय तो नेणें ॥४॥