भजनी मालिका
← भजनांकडे परत

घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें

gheuniyan krutrim songe | nanaparinchya natati rangen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घेऊनियां कृत्रिम सोंगे । नानापरींच्या नटती रंगें ॥१॥ आपण बुडवीती । लाउनि आणिकांही संगती ॥२॥ जाउनि एकांतीं बैसणें । करुनी चावटी बोलणें ॥३॥ निळा म्हणे उपदेशिती । विषय आत्मरुप शिष्याप्रती ॥४॥