कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि
kainchi yala bail ai | namarupen tenhi latikenchi
कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥ मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥
kainchi yala bail ai | namarupen tenhi latikenchi
कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥ मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥
kaivalyacha gabha | vyapuniyan thela nabha
कैवल्याचा गाभा । व्यापूनियां ठेला नभा ॥१॥ तो हा सगुण वेषधारी । उभा चंद्रभागे तीरीं ॥२॥
kaisa yacha vedh janati anubhavi | jayan ahe thavi krupa yachi
कैसा याचा वेध जाणती अनुभवी । जयां आहे ठावी कृपा याची ॥१॥ न ये तें दावितां सांगतांहि परी । वर्ते जें माझारीं भुलवूनियां ॥२॥
kaisa hoto bramhanand | bhagayamand na dekhati
कैसा होतो ब्रम्हानंद । भागयमंद न देखति ॥१॥ वाजतां वादयें नाईके कानीं । वीट मानी अभागी ॥२॥
kaisi vanun tyachi thori | jyachi characharin jivanakala
कैसी वानूं त्याची थोरी । ज्याची चराचरीं जीवनकळा ॥१॥ अदिकरुनि ब्रम्हादिक । शेवटील कीटक धरुनियां ॥२॥
kaisi sampadali vel | taya keval labhachi
कैसी सांपडली वेळ । तया केवळ लाभाची ॥१॥ देवचि झाले चिंत्ते वित्तें । गणगोतेंसहति ॥२॥
kaiseni akalaten man | devavin bhaktanchen
कैसेनि आकळतें मन । देवावीण भक्तांचें ॥१॥ कामक्रोधलोभा शांती । कैसेनि होती मग त्याची ॥२॥
koti janma ghein deva | karin seva tumachich
कोटी जन्म घेईन देवा । करीन सेवा तुमचीच ॥१॥ भक्ति मुक्ति नका आड । घालूं सांकड मज वाटे ॥२॥
koti divalaya dasare san | ghadalen shricharan dekhilen
कोटी दिवाळया दसरे सण । घडलें श्रीचरण देखिलें ॥१॥ सकळही पर्वेव्रतें जोडलीं । तुमचीं वंदिलीं पदांबुजें ॥२॥
koti madanacha bap | prabha phankali tej amup | bhushanen virajalin divya svarup | nande pahila nij nayanin
कोटी मदनाचा बाप । प्रभा फांकली तेज अमूप । भूषणें विराजलीं दिव्य स्वरुप । नंदे पाहिला निज नयनीं ॥१॥ मग याशोदेपाशीं आणिला । म्हणे हा वसुदेव दिधला । येरी म्हणे हा चोरियेला । कोणाचा तानुला न कळे हें ॥२॥
kothen gramin kothen purin | kothen sagarin tariyant
कोठें ग्रामीं कोठें पुरीं । कोठें सागरीं तरियांत ॥१॥ कोठें सांदी कोंदी बिळीं । कोठें वारुळीं धुळीमाजी ॥२॥
kothen phavo yetan mag | nishchal aisa ha prasang
कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥ आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥२॥
kothen vase jhadachivari | kothen pokharin vivarant
कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥ कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥
kothen viguntali | nenon konen gonviyeli
कोठें विगुंतली । नेणों कोणें गोंवियेली ॥१॥ माझी न करीं आठवण । गेली बाळका विसरोन ॥२॥
kothenchi ha nase kothenhi na dise | kothenchi amukase na mhane koni
कोठेंचि हा नसे कोठेंही न दिसे । कोठेंचि अमुकासे न म्हणे कोणी ॥१॥ कोठें याचें होणें कोठें याचें निमणें । कोठूनि येणें जाणें न तर्केचि ॥२॥
kon kariten samadhan | devavin bhaktanche
कोण करितें समाधान । देवावीण भक्तांचे ॥१॥ ब्रम्हसनातन पावविता । कोण या होता भक्तांसी ॥२॥
kon taya lekhi | nahin vithathalin olakhi
कोण तया लेखी । नाहीं विठठलीं ओळखी ॥१॥ करिती तितकें पोटासाठीं । गाणें नाचणें आटाआटी ॥२॥
kon bhagyache te lok | kelen kautuk tumhin jyanchen
कोण भाग्याचे ते लोक । केलें कौतुक तुम्हीं ज्यांचें ॥१॥ वागउनियां कडिये खांदीं । निजात्मपदीं स्थापियलें ॥२॥
konachihi na dharuni asha | bhajaven jagadisha kirtanen
कोणाचीहि न धरुनी आशा । भजावें जगदीशा कीर्तनें ॥१॥ मग तो कृपेचा सागर । उतरील पार भवसिंधू ॥२॥
kaulen pikali paralok penth | hen bhuvaikunth pandhari
कौलें पिकली परलोक पेंठ । हें भूवैकुंठ पंढरी ॥१॥ नाम मुद्रा खरें नाणें । घेणेंदेणें लाभवरी ॥२॥