भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी

goval deti ushtavali | mhanati god hen vanamali | ghaluniyan shrimukh tya kamalin | param santoshen svikari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोवळ देती उष्टावळी । म्हणती गोड हें वनमाळी । घालूनियां श्रीमुख त्या कमळीं । परम संतोषें स्वीकारी ॥१॥ आवडीचें तेचि तें गोड । भाव देखे ज्याचा वाड । त्याचेचि घे येरा निचाड । दांभिका अभिमानायाचें वोसंडी ॥२॥ ऐसा करिती गदारोळ । घालिती येरयेरा मुखीं कवळ । ब्रम्हानंदाचा सुकाळ । हास्यविनोदें जेविती ॥३॥ नाना लावणशाखांच्या परी । नाना पत्रशाखा वाढिल्या वरी । नाना अन्नाअन्नाच्या कुसरी । जेविती मुरारीसमवेंत ॥४॥ म्हणती आजच्या जेवणा । आम्हां श्रीहरी हा पाहुणा । न म्हणे उच्छिष्ट शिळें कोणा । अवघियांचे स्वीकारितु ॥५॥ ऐसें जूउनियां घाले । तंव गाईचे कळप देखिले । पाहती तंव नवल वर्तलें । बुजल्‍या पळती जीवधाकें ॥६॥ निळा म्हणे उठिला पाळा । अवलोकिती जो अवघे डोळां । तंव त्या देखिल्या ज्वाळा । वणवा जळत चौफेरीं ॥७॥