क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें
krida kari gopalapurin | apan shrihari govalansaven
क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें ॥१॥ वेणुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारें सकळांची ॥२॥
krida kari gopalapurin | apan shrihari govalansaven
क्रीडा करी गोपाळपुरीं । आपण श्रीहरी गोवळांसवें ॥१॥ वेणुवादन सप्तस्वरें । वेधी जिव्हारें सकळांची ॥२॥
khag mrug rakshas vanar | daitya danav nishachar | sidhdacharan vidayadhar | nagavikhar kitakadi
खग मृग राक्षस वानर । दैत्य दानव निशाचर । सिध्दचारण विदयाधर । नागविखार कीटकादि ॥१॥ चतुष्पदें जळचरें मनुष्ययाति । दासी वेश्या भिल्ल्णिी किती । कोळी अंत्यज अधम जाती । उध्दरिले श्रीपति सत्संगें ॥२॥
khati apan jen jeviti | tenchi anikanhi vadhiti
खाती आपण जें जेविती । तेंचि आणिकांही वाढिती ॥१॥ आजि बहुता भाग्यें भेटी । झाली चरणीं पडली मिठी ॥२॥
khambasutrin khelavin dori | nachati putalaya disati vari
खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥ तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥
khel khel jhempa ge athavi chidrupa | nahintari pun:punhan na chukati khepa
खेळ खेळ झेंपा गे आठवि चिद्रुपा । नाहिंतरि पुन:पुन्हां न चुकति खेपा ॥१॥ घेंई बारवोटीं गे काढी सागरगोटी । जेणें अर्थ स्वार्थ परमार्थ पडे पोटीं ॥२॥
khel mandi gadiyansaven | apan lapaven lapavi tyan
खेळ मांडी गडियांसवें । आपण लपावें लपवी त्यां ॥१॥ म्हणे अवघे झांका डोळे । आपण पळे पळवी त्यां ॥२॥
khelavilen angavari | alankari shobhavilen
खेळविलें अंगावरी । अळंकारी शोभविलें ॥१॥ मी तों नेणें नेणपणें । होती शहाणे विस्मित ॥२॥
khelavi chalavi | hatin dharuniyan nachavi
खेळवी चालवी । हातीं धरुनियां नाचवी ॥१॥ ऐसी कृपेची ओतली । माझी विठाई माउली ॥२॥
kheli khelata vo vikal sundara | jali athavita nandachya kumaran | sved kampakhed datala sharira | jala virah to nenati itara vo
खेळी खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठविता नंदाच्या कुमारां । स्वेद कंपखेद दाटला शरिरा । जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥ धरा आवरुनी म्हणति वो साजणी । धीर न धरत पडिलि धरणी । येकी सांगति वो जालि झाडपणी । वेगीं आणा आतां पंचाक्षरी गुणीवो ॥२॥
khele heti meti nache ekachi payavari | dhanvoniyan siv atan atmaya shrihari
खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी । धांवोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि ॥१॥ तरिच खेळ बरा रे । नाहिंतरी चेरा ॥२॥
khelon kolakathi pudhen dhanvasil vegen | varuni varichya vari rakho nenasi tun ange
खेळों कोलकाठी पुढें धांवसील वेगें । वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तूं आंगे ॥१॥ आतां खेळ कोलकाठी । रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥
khelon pandakhade ge baisoni nivade | adhin uchali ek mag doni gheni pudhen
खेळों पंडखडे गे बैसोनि निवाडे । आधीं उचली एक मग दोनि घेंई पुढें ॥१॥ सावधान चालि गे नेमाचेचि झेलि । दोन तीन पांच सात सांडी येक उचली ॥२॥
gaganin vasoniyan ravi | prakash bhumandala puravi
गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥ तैसे तुम्ही जेथिल तेथें । असोनियां चाळा भूतें ॥२॥
ganga pavitra sarvaguni | sparshe vitale ranjanin
गंगा पवित्र सर्वागुणी । स्पर्शे विटाळे रांजणीं ॥१॥ तेविं चैतन्य अवघें एक । भूतभेदें त्या कळंक ॥२॥
gajendrachya sange nadiya udhdar | pralhaden asur udhdarilen
गजेंद्रच्या संगे नाडीया उध्दार । प्रल्हादें असुर उध्दरीलें ॥१॥ हनुमंते जुत्पत्ती रिस आणि वानर । पावविले पार भवसिंधु ॥२॥
gadiyan mhane palatan gharen
गडियां म्हणे पळतां घरें । नवनितें क्षीरें असती ते ॥१॥
ganagot avaghen dhan | amhan charan vithobachen
गणगोत अवघें धन । आम्हां चरण विठोबाचें ॥१॥ आणखी दुजें नेणों कांहीं । चाडचि नाहीं धनमानें ॥२॥
garud ani hanumant | pudhen sevensi tishthat
गरुड आणि हनुमंत । पुढें सेवेंसी तिष्ठत ॥१॥ उभा वैकुंठनिवासी । देव येती दर्शनासी ॥२॥
garjat namachya kallolin | ale mahitalin udhdarit
गर्जत नामाच्या कल्लोळीं । आले महीतळीं उध्दरित ॥१॥ ते हे वीर वैष्णव गाढे । कळिकाळ त्यांपुढें तृणप्राय ॥२॥
garjata jati bramhananden | harichi paden haribhakta
गर्जता जाती ब्रम्हानंदें । हरिची पदें हरिभक्त ॥१॥ धाक त्यांचा कळिच्या काळा । कांपे चळचळां देखोनि ॥२॥