भजनी मालिका
← भजनांकडे परत

घुमघुमिती मोहर्‍या नादें

ghumaghumiti mohar‍ya naden

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घुमघुमिती मोहर्‍या नादें । पांवे छंदें वाजविती ॥१॥ शिंगें काहाळा गजर झाला । श्रीहरि शोभला समुदायें ॥२॥ अंगी चंदन बाणली उटी । कास ते गोमटी पितांबरें ॥३॥ निळा म्हणे केशर भाळीं । तेज बंबाळी मुगुटाचें ॥४॥