भजनी मालिका
← भजनांकडे परत

घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार

ghandu jatan alakanr | hoti avaghechi shrungar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
घंडु जातां अळकांर । होती अवघेचि श्रुंगार ॥१॥ नलगे उजळाही देणें । शोभती अंगीच्या बरवेंपणें ॥२॥ आंतु बाहेरी सारिखें । न ये हीनपणा बीकें ॥३॥ निळा म्हणे सुधा माल । हातीं लागला सुढाळ ॥४॥