भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

हरीच्या नामें हरीचे दास जाले सकळिकांस वंदय जगीं ॥१॥ समोर त्याच्या नये काळ । कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरीच्या पायीं विश्वासलें । सवंगडे झाले म्हणउनी ॥१॥ दिवस रातीं नव्हतां तुटी । सांगती गोठी आलोकिका ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥ तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरुनियां घ्यावें चित्त । आवघेंचि वित्त धन माझें ॥१॥ हें तों नव्हे उचित तुम्हां । पुरुषेत्तमा विचारा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हात पाय इंद्रियें मिळोनि मेळा । चला म्हणती पाहों डोळा ॥१॥ देखणेंचि नव्हती देखती काये । अवघीयाचा देखणा डोळाचि आहे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हातीं चक्र सुदर्शन । वागवितां न मनीं त्याचा शीण । आपुल्या भक्तांचे रक्षण । आणि निर्दाळण अरीवर्गा ॥१॥ भक्तस्तवनीं ठेविेले कान । भक्तांपाशीं जीवप्राण । भक्तांकडे लाविलें मन । कोणीं गांजिलें यासाठीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हिशोबी हिशोब अवघाचि मिळाला । सूर्य उदय झाला अंतरदृष्टी ॥१॥ देऊनियां गांठ लाविलें कपाट । साधिलें अचाट गुरुसेवा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हे देखोनियां गोवळ । आले धावोनियां सकळ । कृष्णासी म्हणती युध्द तुंबळ । केलें तुवां वृषभेंसी ॥१॥ आम्ही देखिलें दुरोनी । होतो डोंगरीं बसोनी । तो बैल आम्हांलागुनी । कृष्णा कोण तो सांग पा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा