भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे

govalasange choriya kari | shinki utaruniyan baheri | ani phodi govalakarin | kaval det loniyache

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोवळसंगे चोरिया करी । शिंकी उतरुनियां बाहेरी । आणि फोडी गोवळकरीं । कवळ देत लोणियाचे ॥१॥ दूध तूप साय लोणी । दहीं हुडकूनियां आणी । खाय लवंडी आणि पोरा लागुनी । देऊनियां धणी सुखी करी ॥२॥ देउनी समर्थ हा घेणार । सर्वी सर्वात्मा ईश्वर । म्हणोनियां हा हुडकूनियां घर आणी बाहेरी लपविले ॥३॥ कोठेंहि उरों नेदिचि संचित आणी बाहेरीं ते अकस्मात । वाढूनि सौगडिया देत । आपणहि स्वीकारित त्यांच्यासंगे ॥४॥ देखोनियां तें वृध्द नारी । बोभाट करिती यशोदे व्दारी । म्हणती गे कुमारा आवरीं । नव्हाडी केली गोरसाची ॥५॥ नित्य संवकलासे आमुचे घरीं । धांवोनि तो निशीच्या भरीं । निद्रिस्त असतां शिकींचि उतरी । आणि गोवळां चारी गोरस ॥६॥ निळा म्हणे न सोसवे आतां । नित्य उपद्रव याचा होतां । आणखीही गुह्य गोष्टी सांगतां । होईल लौकिक आमुचाचि ॥७॥