भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान

santan nahin man | dev mani musalaman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥ घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥ तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥३॥