भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे

santancha padhiyavo kaishapari laho | namacha athavo kaisa rahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥ जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥२॥ ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥३॥ तुका म्हणे आम्हीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥