भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतां द्यावें आलिंगन । सांडुनियां थोरपण

santan dyaven alingan | sanduniyan thorapan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतां द्यावें आलिंगन । सांडुनियां थोरपण ॥१॥ अंगे देव करी सेवा । इतराचा कोण केवा ॥२॥ ब्रह्माज्ञानी वंदिती माथां । मुक्ताची सहज मुक्तता ॥३॥ शरण एका जनार्दनीं । यमकाळ वंदिती दोन्हीं ॥४॥