भजनी मालिका

भजने

संताच्या विभुती जगासी उपदेश । देताती सौरस सर्वभावें ॥१॥ परिसाचे परी करिती उपकार । कामधेनु कल्पतरुवर त्यासी वंद्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतावाचोनियां नाम नये हातां । साधनें सांधितां कोटी जाणा ॥१॥ जैसें कातेंविण कारणें संसार । साधन विचार व्यर्थ ठेला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतावाचोनियां सुख कोठें नाहीं । अमृत त्यांचे पायीं नित्य वसे ॥१॥ संताचें संगती होय मोक्षप्राप्ती । नको पा संगती दुर्जनाची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

संतासी भेटता अंग चोरीतो जाण वेश्या सुरा उरा ओळंगीतो ।।१।। देवाकरीता पैका देता रडे रुका। विषयालागी फुका लुटीतसे ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

संतांसी विन्मुख जालासी गव्हारा । नाहीं आतां थारा इहपरलोकीं ॥१॥ नाहीं वेडया संतांचा अंगवळा । झोंप बैसली डोळां अज्ञानाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

संतीं जया हातीं धरिलें । ब्रम्हसनातन ते पावले ॥१॥ आणिकां दुर्लभ जें साधनें । यांच्या प्राप्‍त अवलोकनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संती ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥ तेणें समाधन वृत्ती । नव्हेचि स्थिति पालट ॥२॥

रचनाकार: संत निळोबा