भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसुखा नाहीं पार । तेणें आनंद पैं थोर

santasukha nahin par | tenen anand pain thor

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतसुखा नाहीं पार । तेणें आनंद पैं थोर ॥१॥ ऐशी सुखाची वसती । सनकादिक जया गाती ॥२॥ सुखें सुख अनुभव । सुखें नाचतसे देव ॥३॥ तया सुखाची वसती । एका जनार्दनीं ध्यातसे चिंत्तीं ॥४॥