भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी

santasevesi ang chori | drushti na pado tayavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥ ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥ संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥ तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥